जिल्हा

ठाणे खाडीत सहा फुटांखालील पीओपी मूर्तींचे विसर्जन

ठाणे खाडीत सहा फुटांखालील पीओपी मूर्तींचे विसर्जन
ठाणे खाडीत सहा फुटांखालील पीओपी मूर्तींचे विसर्जन फोटो: ठाणे वैभव

पालिका आयुक्तांसह प्रशासनाला अवमानना नोटीस

ठाणे : ठाणे खाडीत सहा फुटांखालील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याचा आरोप करत ठाणे महापालिका आयुक्तांसह पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला अवमान नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबई, मीरा-भाईंदर व कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात असे प्रकार सुरू असल्यास ते थांबावेत, यासाठी संबंधित पालिका आयुक्तांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी त्यांचे वकील ॲड. रोनिता भट्टाचार्य बेक्टर यांच्यामार्फत ही नोटीस दिली आहे. खाडीत विसर्जन तातडीने न थांबविल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांखालील पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करणे बंधनकारक आहे. नैसर्गिक जलस्रोतांत सहा फुटांहून उंच मूर्तीं विसर्जनाला काही अटींसह परवानगी देण्यात आली आहे. विसर्जनानंतर २४ तासांच्या आत मूर्तींचे अवशेष व अन्य साहित्य बाहेर काढण्याची हमी राज्य सरकारने न्यायालयात दिली होती. परंतु, प्रत्यक्षात महापालिका व पोलीस प्रशासनाच्या डोळ्यांसमोर या नियमांची पायमल्ली केली जात आहे.

दरम्यान, या संदर्भात अशी नोटीस मला अद्याप तरी आल्याचे समजलेले नाही. तरीही कार्यालयात अशी काही नोटीस आली आहे का, याची खात्री करतो, अशी प्रतिक्रिया ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475