क्रीडा

बांगलादेशसमोर अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान

बांगलादेशसमोर अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान
बांगलादेशसमोर अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान फोटो: ठाणे वैभव
सात वेळा विजेतेपद पटकावणारी ऑस्ट्रेलिया सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी निर्धास्त बसली आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि भारत यांनी ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली असली, तरी गतविजेते प्रत्येक वेळी संकटातून मार्ग काढत सामना आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरले. पहिल्यांदाच विश्वचषकात नेतृत्व करत असलेली कर्णधार अ‍ॅलिसा हिली आपल्या खेळाडूंमधून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यात आणि संघाचे समन्वय साधण्यात अप्रतिम ठरली आहे. न्यूझीलंडविरुद्ध ऍश्ले गार्डनरचे शानदार शतक असो, पाकिस्तानविरुद्ध बेथ मुनीची संघाला संकटातून बाहेर काढणारी खेळी असो किंवा भारताविरुद्ध हिलीची दमदार फटकेबाजी — सर्वच प्रसंगी ऑस्ट्रेलियाने आपला दबदबा दाखवला आहे. किमान सहा गुणवंत अष्टपैलू खेळाडू असलेला हा संघ इतरांपेक्षा सरस ठरतो. त्यापैकी अ‍ॅनाबेल सदरलँडने सातत्यपूर्ण गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यंत 10 बळींसह ती स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली आहे. दुसरीकडे, बांगलादेशने आतापर्यंत केवळ एकच विजय मिळवला असून आता त्यांच्यासमोर सर्वात कठीण आव्हान आहे - ऑस्ट्रेलिया, ज्यांच्यावर त्यांनी कधीच मात केलेली नाही. निगर सुलताना जोतीच्या नेतृत्वाखालील संघाने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट खेळ दाखवला, पण निर्णायक टप्प्यांवर ते  दबावाखाली आले आणि सामना गमावून बसले. या सामन्यात पुन्हा एकदा बांगलादेशच्या फिरकीपटूंवर सर्वांची नजर असेल. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी मजबूत आहे. दहाव्या नंबर वर येणाऱ्या अलाना किंगनेसुद्धा या विश्वचषकात अर्धशतक ठोकले आहे. म्हणूनच बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजांना काहीतरी चमत्कारिक करावं लागेल. ऑफ स्पिन, लेग स्पिन, लेफ्ट आर्म स्पिन - बांगलादेशकडे सगळं काही आहे. गोलंदाजांनी त्यांची छाप पाडली आहे. मात्र फलंदाजांनी प्रभावी प्रदर्शन केलेले नाही. शोभना मोस्तरीने जरी चांगली कामगिरी केली असली, तरी कर्णधार जोती, रितु मोनी आणि फर्गाना हक यांच्याकडून आता मोठ्या खेळींची अपेक्षा असेल. या सामन्यातील विजय ऑस्ट्रेलियाला अव्वल-4मध्ये स्थान निश्चित करून देईल, तर बांगलादेशसाठी ही लढत उपांत्य फेरीची आशा जिवंत ठेवण्याची शेवटची संधी ठरेल. आमने-सामने एकूण: ऑस्ट्रेलिया - 4, बांगलादेश - 0 विश्वचषकात: ऑस्ट्रेलिया - 1, बांगलादेश - 0 आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत: ऑस्ट्रेलिया - 1, बांगलादेश - 7 संघ ऑस्ट्रेलिया: अ‍ॅलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, ऍश्ले गार्डनर, किम गार्थ, हेदर ग्रॅहम, अ‍ॅलाना किंग, फिबी लिचफिल्ड, ताहलिया मॅक्ग्रा, सोफी मोलिन्यु, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शुट, अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया व्हॉल, जॉर्जिया वेअरहॅम बांगलादेश: निगर सुलताना जोती (कर्णधार), नाहिदा आक्तर, फर्गाना हक, रुब्या हैदर झेलिक, शार्मिन आक्तर सुप्ता, शोभना मोस्तरी, रितु मोनी, शॉर्ना आक्तर, फहीमा खातून, रबिया खान, मारुफा आक्तर, फरीहा इस्लाम त्रिस्ना, शांजिदा आक्तर मागला, निशिता आक्तर निशी, सुमैया आक्तर कोणत्या खेळाडूंवर लक्ष असेल ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार अ‍ॅलिसा हिलीने भारताविरुद्ध याच मैदानावर खेळताना अफलातून शतक झळकावले होते, आणि आता ती पुन्हा इथेच बांगलादेशचा सामना करणार आहे. त्या सामन्यात अष्टपैलू अ‍ॅनाबेल सदरलँडने आपल्या वेगवान गोलंदाजीतील विविधतेच्या जोरावर पाच बळी घेत प्रभावी कामगिरी केली होती. बांगलादेशसाठी कर्णधार निगर सुलताना जोतीला फलंदाजीत अधिक जबाबदारी घ्यावी लागेल आणि नवख्या फलंदाजांना योग्य मार्गदर्शन करावे लागेल. गोलंदाजीत डावखुरी फिरकीपटू नाहिदा आक्तर पहिल्या पॉवरप्लेमध्ये हिलीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. सामन्याची थोडक्यात माहिती तारीख: 16 ऑक्टोबर 2025 वेळ: दुपारी 3 वाजता ठिकाण: डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम् थेट प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क , जिओहॉटस्टार

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475