जिल्हा

यंदा गणेश मंडळांना भरावे लागणार मंडप शुल्क

यंदा गणेश मंडळांना भरावे लागणार मंडप शुल्क
यंदा गणेश मंडळांना भरावे लागणार मंडप शुल्क फोटो: ठाणे वैभव
ठाणे : गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी लागणारे शुल्क माफ करण्याचा घेण्यात आलेला निर्णय यावर्षी प्रशासनाकडून मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी मंडप उभारणीचे शुल्क गणेश मंडळांना भरावे लागणार आहे. गणेश मंडळांना शुल्क आकारू नये असा राजकीय मंडळींकडून निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासनाने शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असल्याने गणेश मंडळे तसेच राजकीय मंडळींमध्ये या निर्णयांमुळे नाराजी पसरण्याची चिन्हे आहेत. मंडप उभारणी परवानगी घेण्याबाबत ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा देखील दिली जाणार आहे. परवानगीसाठी पोर्टल सुरु करण्याचा विचार असून या पोर्टलद्वारे गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तसेच या संदर्भात गणेशोत्सव मंडळ, पोलीस यंत्रणा, वाहतूक शाखा यांची लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात उभारण्यात येणारे मंडप, लाउड स्पीकर यांच्यासह विविध परवानग्या घेणे बंधनकारक आहे. महापालिका ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पध्दतीने देखील अर्ज स्विकारणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाकडून पोर्टल सेवा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या पोर्टलद्वारे गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने मंडपासाठी अर्ज केल्यानंतर प्रभाग समितीमधील बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या माध्यमातून स्थळ ठिकाणी जाऊन मंडपाच्या आकाराची पाहणी केली जाणार आहे, त्यानंतर अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जाणार, त्यात स्थानिक पोलीस, वाहतुक पोलीस आणि अग्निशमन विभाग या विभागांनी देखील पाहणी केल्यानंतर त्या अर्जास ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर मंडळांना मंडप उभारणीची परवानगी दिली जाणार आहे. वाहतुक आणि पोलीस परवानगी देखील ऑनलाईन स्वरुपात दिली जाणार आहे. दरम्यान मागील दोन वर्षे कोरोना काळात मंडळांना मंडप उभारणी शुल्कात सवलत देण्यात आली होती. किंबहुना हे शुल्क माफ करण्यात आले होते. तत्कालीन महापौर नरेश म्हस्के यांच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु आता कोरोना नसल्याने यंदा महापालिका मंडळांकडून शुल्क आकारणी करणार आहे. त्याला मात्र येत्या बैठकीत विरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475