जिल्हा

भाईंदरचे शिधावाटप कार्यालय बनले दलालांचा अड्डा

भाईंदरचे शिधावाटप कार्यालय बनले दलालांचा अड्डा
भाईंदरचे शिधावाटप कार्यालय बनले दलालांचा अड्डा फोटो: ठाणे वैभव
आ. सरनाईक यांच्याकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती भाईंदर: मीरा-भाईंदर शहरातील शिधापत्रिका कार्यालयात दलालांचा राजरोस अड्डा बनला आहे. सर्व सामान्य नागरिकांना दलालांच्या माध्यमातून यावे लागते. हा कारभार सुधारा नाही तर घरी जा, असे आज आमदार प्रताप सरनाईक यांनी भाईंदरच्या शिधावाटप कार्यालयात अचानक उपस्थित रहात अधिकाऱ्यांना सुनावले. अधिकाऱ्यांना आमदार सरनाईक यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. शिधापत्रिका काढण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार होतो यामुळे जाहीर झाले असून यापुढे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला थेट शिधापत्रिका मिळाली पाहिजे, गरिबांना चांगले धान्य मिळाले पाहिजे असे आदेश आमदार सरनाईक यांनी दिले आहेत. मीरा-भाईंदर शहरातील शिधावाटप कार्यालयाबाबत अनेक तक्रारी आ. सरनाईक यांच्याकडे गेल्या होत्या. रेशन दुकानाबाबत अनेक नागरिक तक्रारी करत होते. नाव कमी करणे आणि नाव वाढवणे, नवीन रेशनकार्ड बनवणे याबाबत अनेक तक्रारी होत्या. येथील अधिकारीच सामान्य लोकांना दलालाकडे पाठवतात. पाच ते दहा हजार रुपये घेऊन दलाल शिधापत्रिका बनवून देतात अशी माहिती पुढे आली. आज अचानक श्री. सरनाईक यांनी शिधावाटप कार्यालय क्रमांक ४१फ येथे जाऊन शिधावाटप अधिकारी राजा जाधव आणि सहायक शिधावाटप अधिकारी शैलेंद्र मायावंशी यांना या गलथान कारभाराचा जाब विचारला. आमदार सरनाईक हे शिवसेना पदाधिकाऱ्यांसह आल्याचे कळताच दलाल ऑफिस आवारातून पळून गेले. भाईंदरच्या शिधावाटप कार्यालयात २० कर्मचारी आहेत. हे कर्मचारी एजंटवर निर्भर आहेत. दोन-तीन लोक थेट डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून इकडे काम करत असून दलाल लोक त्यांच्याकडून कामे करुन घेतात. हा सगळा कारभार पाहून आमदार सरनाईक खूप चिडले. या कर्मचाऱ्यांपैकी काही लोक निलंबित झाले पाहिजेत. दोषींना चौकशी करून निलंबित करण्याची मागणी करणार, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475