जिल्हा
भाजपच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
भाजपच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
फोटो: ठाणे वैभव
कल्याण: डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपच्या चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवली पिंपळेश्वर मंदिर परिसरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी, आणि प्रमिला चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील शिवसेनेत दाखल झाले. कडोंमपा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आपले नशीब आजमावले होते. मात्र त्यांना यात अपयश आल्याने आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून या पक्ष प्रवेशामुळे डोंबिवलीतील सेनेची राजकीय ताकद वाढणार आहे.
यावेळी सर्वांचे पक्षात जाहीर स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी युवासेनेचे सागर जेधे यांची डोंबिवली शहर सचिव पदी, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिवपदी सागर दुबे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहर सचिव संतोष चव्हाण यांच्यासह प्रकाश म्हात्रे, गुलाब वझे, स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475