जिल्हा

माजी आमदार नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

माजी आमदार नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
माजी आमदार नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला फोटो: ठाणे वैभव

भिवंडी : भिवंडीतील गाजलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात माजी आमदार नरेंद्र पवार यांना भिवंडी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. कारंडे यांनी सोमवारी हा आदेश दिला. विशेष म्हणजे, एका महिलेने केलेल्या तक्रारीवरून पडघा पोलीस ठाण्यात पवार यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेपासून वाचण्यासाठी पवार यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. २३ सप्टेंबर रोजी दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकण्यात आला. बचाव पक्षाच्या वकिलांनी जामिनाची मागणी केली, तर पोलिसांनी तपास आणि प्रकरणातील वस्तुस्थितीचा हवाला देत त्याला तीव्र विरोध केला. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान तक्रारदार (पीडित महिला) न्यायालयात उपस्थित होत्या, तर आरोपी नरेंद्र पवार आणि तपास अधिकारी अनुपस्थित होते. जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आता नरेंद्र पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आता पडघा पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475