जिल्हा

दिवे-केवणी खाडीत १० बार्ज अन् १६ सक्शन पंप जप्त

दिवे-केवणी खाडीत १० बार्ज अन् १६ सक्शन पंप जप्त
दिवे-केवणी खाडीत १० बार्ज अन् १६ सक्शन पंप जप्त फोटो: ठाणे वैभव

तब्बल साडेतीन कोटींचा मुद्देमाल उद्ध्वस्त

ठाणे : जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांविरोधात आजवरची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे.

भिवंडी तालुक्यातील दिवे-केवणी (दिवे बंदर) खाडीपात्रात महसूल विभाग, जिल्हा खनिकर्म विभाग, दक्षता पथक, पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री धाड टाकून तब्बल १० बेकायदेशीर बार्ज आणि १६ शक्तिशाली सक्शन पंप जप्त केले आहेत. सुमारे ३.५० ते ३.६० कोटी रुपयांचा हा अफाट मुद्देमाल नष्ट करण्याची अत्यंत धाडसी व प्रशासकीय जिद्दीची कारवाई सद्य:स्थितीत सुरू असून, या धडक सर्जिकल स्ट्राईकने बेकायदेशीर वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

सोमवार, २८ सप्टेंबरच्या रात्रीपासून सुरू झालेली ही शोधमोहीम मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ च्या पहाटे सुमारे २:४५ वाजता अत्यंत निर्णायक वळणावर आली. ठाणे जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांच्या थेट नेतृत्वाखालील दक्षता पथक क्र. १ व क्र. २, ठाणे तहसिलदार उमेश पाटील, भिवंडी तहसिलदार अभिजीत खोले आणि अन्य अधिकाऱ्यांचे पथक दिवे-केवणी स्मशानभूमीजवळील खाडीपात्रात गस्त घालत होते. अंधाराचा फायदा घेऊन खाडीच्या पोटात चाललेला मोठ्या प्रमाणातील बेकायदेशीर वाळू उपसा अधिकाऱ्यांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटला नाही. संयुक्त पथकाची चाहूल लागताच तेथील कामगारांमध्ये भीतीची लाट पसरली. कारवाईपासून वाचण्यासाठी कामगारांनी बार्ज व सक्शन पंपांचे व्हॉल्व्ह उघडून ते पाण्यात बुडवण्याचा कुटिल प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर पळून जाण्याच्या गडबडीत बार्जच्या साहाय्याने खाडीपात्रातील नैसर्गिक कांदळवनाला (मॅन्ग्रोव्हज) थेट धडक देऊन पर्यावरणाचेही प्रचंड नुकसान केले.

पथकाला पाहताच बहुतांश कामगारांनी खाडीच्या खोल पाण्यात उड्या मारून पळ काढला; मात्र अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तोहीब रमझान शेख (१९) मूळ रा. साहिबगंज, झारखंड या कामगाराला रंगेहात पकडण्यात यश आले. त्यास पुढील कडक कायदेशीर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्तात स्वाधीन करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेले १० चे १० बार्ज हे 'महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड'कडे अजिबात नोंदणीकृत नसून ते पूर्णपणे अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475