जिल्हा

ठाणे शहरात ड्रोन उडवण्यास मनाई

ठाणे शहरात ड्रोन उडवण्यास मनाई
ठाणे शहरात ड्रोन उडवण्यास मनाई फोटो: ठाणे वैभव
पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आता ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही व्यक्तीला ड्रोन किंवा तत्सम उपकरणे उडवण्यास मनाई असेल. हा आदेश 14 मे 2025 पासून लागू झाला असून 3 जून 2025 पर्यंत तो अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 आणि इतर लागू कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य आणि तातडी लक्षात घेऊन हा आदेश तातडीने लागू करण्यात आला आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. उपायुक्त (मुख्यालय-1), विशेष शाखा, ठाणे शहर, डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475