जिल्हा

फुगाळे गावात ड्रोन पडल्याने शहापूर तालुक्यात खळबळ

फुगाळे गावात ड्रोन पडल्याने शहापूर तालुक्यात खळबळ
फुगाळे गावात ड्रोन पडल्याने शहापूर तालुक्यात खळबळ फोटो: ठाणे वैभव
शहापूर: तालुक्यातील कसाराजवळील फुगाळे गावातील आघानवाडी गावात एका डोंगरावर आकाशात उडणारा ड्रोन अचानक खाली कोसळल्याने डोंगरावर खेळत असणाऱ्या मुलांमध्ये एकच घबराट उडाली होती. आज दुपारी 2 च्या सुमारास आघानवाडीतील लहान मुलं डोंगरावर खेळत होती. अचानक आकाशातून मोठा आवाज करीत हवेत घिरट्या घालत ते एका झाडावर पडले. मोठा आवाज होत ड्रोन पडल्याने खेळणाऱ्या मुलांनी घटनास्थळी धाव घेतली. लहानग्या मुलांना या ड्रोनबाबत कुतूहल वाटल्याने त्यांनी विमान पडले विमान पडले असा आक्रोश करीत झाडावर पडलेले विमान त्यांनी झाडावरून खाली उतरवून डोंगराच्या खाली वस्तीजवळ आणले. गावाचे सरपंच जिवा भला यांनी याबाबत तत्काळ कसारा पोलीस ठाण्याशी संपर्क करून त्यांना माहिती दिली. कसारा पोलिसांनी सदर ड्रोनबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत पोलीस निरीक्षक सुरेश गावीत यांनी आपल्याला कर्मचाऱ्यांसाह घटनास्थळी धाव घेतली. त्या दरम्यान सदर ड्रोन एका सर्व्हे कंपनीचा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार जलसंपदा विभागाचा वाडा तालुक्यात सर्व्हे सुरु होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पायोनियर इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने ड्रोनच्या मदतीने सर्व्हे सुरु केला होता. सर्व्हे सुरु असताना ड्रोनची दिशा भरकटल्याने सदर ड्रोन शहापूर तालुक्यातील फुगाळे आघानवाडी येथे डोंगरावरील एका झाडावर पडला असल्याची माहिती ठेकेदार कंपनीने कसारा पोलिसांना दिली. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी सुरेश गावीत पुढील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475