प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण
भाईंदर: ठाण्यातील मानपाडा परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या थरारक हत्येचा तपास करत असताना ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाला मोठे यश आले आहे. गुरुवारी पहाटे पोलिसांनी मीरा रोड परिसरातून तीन महिला आणि दोन पुरुषांसह एकूण पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
या संशयितांची नावे करिश्मा संतोष कनोजिया, रेणू अच्छेलाल मौर्य, सुनील कुसंता कनोजिया आणि रोशन रामबोध कैरी अशी असून ते मानपाडा आणि मनोरमानगर भागातील रहिवासी आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या तीन महिला या हत्येचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा पप्या शिंदे आणि संतोष कनोजिया यांच्या सतत संपर्कात होत्या. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येच्या आधी आणि हत्येनंतरही या महिलांचा आरोपींशी थेट संपर्क झाला होता. प्राथमिक तपासात या महिला आणि हल्लेखोरांमध्ये पैशांची मोठी देवाणघेवाण झाल्याचेही समोर आले असून, पोलीस या आर्थिक व्यवहाराचा सखोल तपास करत आहेत.