जिल्हा

मानलेल्या बहिणीची छेड काढली म्हणून गोळीबार

मानलेल्या बहिणीची छेड काढली म्हणून गोळीबार
मानलेल्या बहिणीची छेड काढली म्हणून गोळीबार फोटो: ठाणे वैभव
मुंब्र्यात पुन्हा रक्तरंजित थरार एकाचा मृत्यू तर दोघे जखमी ठाणे: मुंब्रा येथील कैलासनगर परिसरात गुरूवारी सकाळी एका व्यक्तीने तीन जणांवर गोळ्या झाडल्या. त्यात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले आहेत. मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याची बाब पोलिसांच्या तपासाच पुढे आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील कैलासनगर परिसरात सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालयाजवळील बिस्मिल्ला चाळ, रूम क्रमांक दोन येथे हा प्रकार घडला. जयन नायर (५१) याच्या मानलेल्या बहीणीची छेड काढण्यात आली होती. याच कारणावरून त्याचा काही जणांशी वाद झाला. हा वाद चिघळल्यानंतर त्याने संतापाच्या भरात गोळीबार केला. या गोळीबारात अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख हे तिघे गंभीर जखमी झाले. जयन हा तेथून फरार झाला होता. मात्र मुंब्रा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीचा शोध घेत त्याला गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह अटक केली आहे. दरम्यान, जखमींना तत्काळ मुंब्य्रातील काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अकबर अब्दुल शेख याचा मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे कैलास नगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी करत घटनेचा आढावा घेतला. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. मानलेल्या बहीणीची छेड काढली म्हणून जयन शिवानंदन नायर (५१) याने तिघांवर गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यु झाला तर, दोघे जखमी झाले आहेत. जयनला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे. काही दिवसांपुर्वी मुंब्रा येथील कौसा भागात नदीम खान उर्फ बाबा खान याच्या कारवर गोळीबार झाला होता. या घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपींना पकडत असताना, आरोपींनी पोलिसांच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारामध्ये दोन व्यक्ती जखमी झाल्या होत्या. त्यानंतर ठाण्यातील पाचपाखाडी भागात भर रस्त्यात गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात घडला. आता मुंब्य्रात पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून यामुळे गोळीबाराचे सत्र शहरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475