जिल्हा

नमुंमपाची ११२ कोटींची ऐतिहासिक पाणीपट्टीची वसुली

नमुंमपाची ११२ कोटींची ऐतिहासिक पाणीपट्टीची वसुली
नमुंमपाची ११२ कोटींची ऐतिहासिक पाणीपट्टीची वसुली फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये म्हणजेच 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 112 कोटींची पाणीपट्टीची वसूली करून विक्रमी कामगिरी नोंदविली आहे. महानगरपालिका स्थापन झाल्यापासून एका आर्थिक वर्षात झालेली ही सर्वाधिक पाणीपट्टी वसुली असून ही एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच प्रभावी नियोजनबद्ध वसुली मोहिमेमुळे ही यशस्वी कामगिरी साध्य झाली आहे. पाणीपट्टी वेळेत भरणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. यामागे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे प्रभावी नेतृत्व, दूरदृष्टी आणि काटेकोर नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. पाणीपट्टी वसुली प्रक्रियेत पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि नागरिकांपर्यंत सहज पोहोचणारी कार्यपद्धती यावर विशेष भर देण्यात आला. विविध उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून त्याचा सकारात्मक परिणाम वसुलीत दिसून आला. अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाने व संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पाणीपट्टी वसुलीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. ऑनलाईन पेमेंट प्रणाली, क्यू आर कोडद्वारे, विविध डिजिटल माध्यमांद्वारे सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच एसएमएस, नोटीस, व्हॉट्सअॅप संदेश आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने वसुली प्रक्रियेला गती मिळाली. तसेच नोकरदार वर्गास आणि सर्वसामान्य नागरिकांना मार्च 2026 मध्ये साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील पाणी पट्टी भरणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेची पाणी देयक संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती. या सर्व सुविधांमुळे यंदा पाणीपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ झाली असून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 112 कोटींची विक्रमी वसुली करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणी पुरवठा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475