जिल्हा
अंबरनाथच्या जुन्या डंपिंग ग्राऊंडला आग
अंबरनाथच्या जुन्या डंपिंग ग्राऊंडला आग
फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: अंबरनाथ येथील जुन्या डंपिंग ग्राऊंडला आज सायंकाळी अचानक भीषण आग लागली होती.
मोरीवली पाड्यातील जुन्या डंपिंग ग्राउंडवर आज गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर पसरला. यामुळे परिसरातील नागरिकांना धुराचा त्रास जाणवू लागला.
अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन वाहनांच्या सहाय्याने अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475