जिल्हा

गारेगार लोकलमधून केला ७१ लाख नागरिकांनी प्रवास

गारेगार लोकलमधून केला  ७१ लाख नागरिकांनी प्रवास
गारेगार लोकलमधून केला ७१ लाख नागरिकांनी प्रवास फोटो: ठाणे वैभव
‘म.रे’.ला ३२.२२ कोटींचे उत्पन्न ठाणे : मध्य रेल्वेच्या वातानुकूलित उपनगरी गाडीतून १ जानेवारी २०२३ ते २४ मे २०२३ पर्यंत तब्बल ७१.३३ लाख प्रवाशांनी प्रवास केला असल्यामुळे म. रेल्वेच्या तिजोरीत दणदणीत ३२.२२ कोटी उत्पन्नाची नोंद झाली. मध्य रेल्वेतील एसी लोकलला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १ जानेवारी २३ ते २४ मे २३ पर्यंत एसी लोकलने प्रवास केलेल्या एकूण प्रवाशांची संख्या ७१.३३ लाख होती. त्यातून म. रेल्वेला एकूण उत्पन्न रु. ३२.२२ कोटी मिळाले. मे महिन्यात १ ते २४ मे २३ पर्यंत एसी लोकलमधून दररोज सरासरी ५८,८८० प्रवाशांनी प्रवास केला. १ मे २०२२ ते २४ मेच्या तुलनेत एसी लोकलने प्रवास केलेल्या प्रवाशांची संख्या ६.१७ लाख इतकी होती. २१ मे २३ ते २४ मे २३ पर्यंत प्रवाशांची संख्या १४.१३ लाखपर्यंत पोहचली. याचा अर्थ प्रवाशांच्या संख्येमध्ये तब्बल २२८% ची वाढ झाली आहे. एसी लोकलद्वारे मिळवलेल्या महसुलातही लक्षणीय वाढ झाल्याचे आढळते. १ मे २२ ते २४ मे २२ पर्यंत फक्त रु. २.८३ कोटी रुपये होती.मात्र १ मे २३ ते २४ मे २३ पर्यंत ६.६६ कोटी रु. उत्पन्न म. रेल्वेच्या तिजोरीत जमा झालेत. एसी लोकलच्या उत्पन्नात २३४% ची वाढ झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले. सध्या, मध्य रेल्वे उपनगरीय विभागात ४ रेकसह ५६ वातानुकूलित सेवा चालवते. विशेषत: वर्षभरापूर्वी भाडे कमी केल्यानंतर सुरक्षित आणि मस्त राइड आॅफर करण्यासोबतच, वातानुकूलित लोकलने प्रवास करणेदेखील किफायतशीर झाले आहे. याव्यतिरिक्त रेल्वेने प्रथम श्रेणी त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक सीझन तिकीट धारकांना प्रथम श्रेणी क्युएसटी, एचएसटी आणि वायएसटीमध्ये शिल्लक राहिलेल्या दिवसांचा विचार न करता संपूर्ण कालावधीत प्रथम श्रेणी तिमाही, सहामाही व वार्षिक सीझन तिकीट आणि एसी तिमाही, सहामाही व वार्षिक सीझन तिकिटांमधील भाड्याचा फरक भरून वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करण्याची सुविधा दिली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475