जिल्हा

श्रावणातील उपवासाला महागाईची झळ

श्रावणातील उपवासाला महागाईची झळ
श्रावणातील उपवासाला महागाईची झळ फोटो: ठाणे वैभव
साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या दरात वाढ नवी मुंबई: मागील महिन्यात गगनाला भिडलेले दर आता आवाक्यात आले असताना आता उपवासाच्या साहित्याची दरवाढ होत चालली आहे. बाजारात शेंगदाणे आणि साबुदाण्याच्या दरात सरासरी २० ते २५टक्के वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात शेंगदाण्याने प्रतिकिलो दिडशे तर साबुदाण्याने शंभरी गाठली आहे. त्यामुळे श्रावण मासातील उपवासालाही महागाईची झळ बसली आहे. यंदा श्रावण आणि अधिक मास असल्याने श्रावण उपवास दुप्पट झाले. त्यामुळे उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी वाढली आहे. परंतु यंदा अवकाळी पावसाने साबुदाणा आणि शेंगदाण्याचे उत्पादन घटले आहे. एपीएमसी बाजारात अवघे ५०टक्के आवक होत आहे. त्यामुळे साबुदाणा आणि शेंगदाणाच्या दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. कर्नाटक आणि गुजरात येथून साबुदाणा, शेंगदाणे बाजारात दाखल होतात. गुजरातमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील भुईमुगाच्या पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन कमी झाले. सोमवारी एपीएमसीत शेंगदाणे ३५० क्विंटल, साबुदाणा २५० क्विंटल आवक झाली आहे. त्यामुळे शेंगदाण्याच्या किरकोळ दरात प्रति किलो २० रुपयांची तर साबुदाणा १५-३० रुपयांनी महागला आहे. त्यामुळे किरकोळीत शेंगदाणे १२०-१३० रुपयांवरून १४०-१५० रुपये तर साबुदाणा ६५-७० वरुन ८०-१०० रुपयांवर पोचला आहे. पुरवठा कमी आणि श्रावण महिन्यात मागणी वाढल्याने दरवाढ झाली असून श्रावणी उपवास महागला आहे. --------------- घाऊक किरकोळ शेंगदाणा १२०-१३० १४०-१५० साबुदाणा ६४-७७ ८०-१०० ------------------- शेंगदाणे आणि साबूदाण्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा साबुदाणा आणि शेंगदाणे उत्पादन कमी असून बाजारात अवघे ५०टक्के आवक होत आहे. त्यामुळे दरात २० ते २५टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती वाशी येथील किरकोळ विक्रेता विनोद पुरबजी यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475