देश-विदेश
सोन्याच्या दरात घसरण
सोन्याच्या दरात घसरण
फोटो: ठाणे वैभव
नवी दिल्ली: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धात सोने आणि चांदीमध्ये सततची घसरण सुरू आहे. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी तब्बल सहा हजार रुपयांची घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोने आता एक लाख 47 हजार रुपयांच्या आसपास विकले जात आहे. 10 दिवसांपूर्वी याची किंमत एक लाख 60 हजार रुपयांपेक्षा जास्त होती. सोन्याच्या घसरणीमुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
19 मार्च, दुपारी 3 दरम्यान 10 ग्रॅम सोने एक लाख 47,559 रुपये होते. यात 5,466 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याने आतापर्यंत निच्चांक एक लाख 46,757 रुपये आणि एक लाख 52,449 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. 2 मार्च 2026 रोजी सोन्याने एक 69,349चा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. युद्धजन्य परिस्थिती सोने-चांदीचे दर सामान्यत: वाढतात. मात्र पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर आणखी मजबूत झाला तसेच अमेरिकेने फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्यास नकार दिला तर सोन्याचे भाव एक लाख 40 हजारापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. सोन्याच्या किमती कमी होण्याची कारणे नफा वसूली- विक्रमी उच्चांकानंतर गुंतवणूकदारांकडून नफा वसूली केली जात आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475