जिल्हा

ठाणे जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांचे सक्षमीकरण प्रकल्प रखडले

ठाणे जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांचे सक्षमीकरण प्रकल्प रखडले
ठाणे जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांचे सक्षमीकरण प्रकल्प रखडले फोटो: ठाणे वैभव
पुण्याच्या आधार औद्योगिक सहकारी संस्थेला काळ्या यादीत टाकणार ठाणे: आदिवासी, ग्रामीण आणि दुर्गम भागातील स्वयंसहायता गटांसाठी प्रकल्प राबवून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाने पुण्याच्या आधार औद्योगिक सहकारी संस्थेला निधी दिला, मात्र ठाणे जिल्ह्यात हे प्रकल्प रखडल्याने या संस्थेची चौकशी करून तिला काळ्या यादीत टाकणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी दिली. आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळात या संस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील स्वयंसहायता गटांच्या सक्षमीकरणासाठी कुक्कुटपालन, शेळीपालन, राईस मिल आदी प्रकल्प पुणे येथील आधार संस्थेमार्फत राबवण्यात येणार होते. याकरिता राज्य शासनाने संस्थेला सुमारे पाच कोटींचा निधी देखील दिला होता. मात्र संस्थेने हे प्रकल्प राबवलेच नाहीत. त्यामुळे या संस्थेने यापूर्वी केलेल्या कामांची चौकशी करून तिला काळ्या यादीत टाकण्याची मागणी श्री.केळकर यांनी केली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी संबंधित संस्थेला शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील ३२ स्वयंसहायता गटातील महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी निधी दिल्याचे सांगितले. मात्र हा निधी वेळेत खर्च केला नाही, त्यामुळे एक वर्ष ही प्रकल्प रखडले. या प्रकरणी संस्थेने यापूर्वी केलेल्या कामांची चौकशी करून तिला काळ्या यादीत टाकणार असल्याची माहिती सभागृहाला दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475