जिल्हा

मुख्याध्यापिकेसह पाच आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुख्याध्यापिकेसह पाच आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुख्याध्यापिकेसह पाच आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी फोटो: ठाणे वैभव
* शहापूरमधील शाळेतील मुलींची आक्षेपार्ह तपासणी प्रकरण * शाळेची मान्यता रद्द करण्याचे महिला आयोगाचे संकेत ठाणे: शहापूरच्या दमाणी इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थिनींची आक्षेपार्ह तपासणी केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली. याची दखल महिला आयोगाने घेतली. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शाळेला भेट दिली. यावेळी शाळा प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करत शाळेची मान्यता रद्द करण्याचे संकेत त्यांनी दिले. दरम्यान शहापूर पोलिसांनी मुख्याध्यापिकेसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला. कल्याण न्यायालयाने पाचही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.. या प्रकरणी संस्था चालक आणि एक अन्य शिक्षिका फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने त्यांचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातील नामांकित आर एस दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्यध्यापिकेसह आठ जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच शिक्षिका, दोन महिला कर्मचारी, एक शिपायाचा समावेश आहे. शहापूर शहरातील आर एस दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये 300 च्या जवळपास मुली शिक्षण घेत आहेत. 8 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 च्या सुमारास मुख्यध्यापिकांनी मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावले. त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर आणि बाथरुमच्या लादीवरील रक्ताचे डाग असलेले फोटो प्राजेक्टरवर दाखवले. या धक्कादायक घटनेची माहिती समजताच पालकांनी ( 9 जुलै रोजी ) शाळा गाठत मुलींसोबत घडलेल्या प्रकराचा जाब विचारत गोंधळ घातला. दुसरीकडे इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशा रीतीने या विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद प्रकार केल्याचा आरोप केला. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शहापूर पोलीस स्थानकास भेट देत या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पालकांची मते देखील त्यांनी जाणून घेतली. रतनबाई दमानिया स्कूल ही शासनाच्या शिक्षण विभागाच्या कोणत्याही नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे झालेला हा प्रकार अत्यंत निंदनीय व घाणेरडा असून यात आठ जणांवर पोस्को अंतर्गत कारवाई करण्यात आली. उर्वरित आरोपींना देखील लवकरात लवकर ताब्यात घेऊन चौकशी करून अटक केली जाईल. शक्य असल्यास या शाळेची मान्यताही रद्द करण्यात येईल, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला. शाळा प्रशासनाच्या या भयंकर प्रकाराबद्दल संतप्त झालेल्या पालकांनी एकत्र येऊन काल सकाळी थेट दमानी स्कुल गाठून प्राचार्यांना घेराव घालून जाब विचारला होता. दरम्यान संतप्त पालकांचा रुद्रावतार पाहून प्राचार्यांनी पोलिसांना पाचारण केले. यामुळे शालेय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. यावेळी शहापूरचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांच्यासह पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी पालकांना शांत करण्याचा प्रयत्न करत संस्थाचालकांना व गटशिक्षणाधिकारी रामचंद्र विशे यांना फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475