जिल्हा

१२०० चोरांकडून दोन कोटीची वीजचोरी!

१२०० चोरांकडून दोन कोटीची वीजचोरी!
१२०० चोरांकडून दोन कोटीची वीजचोरी! फोटो: ठाणे वैभव

महावितरणची ऑगस्टमध्ये कारवाई

कल्याण : महावितरणच्या कल्याण परिमंडळाने ठाणे, पालघर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात ऑगस्टमध्ये राबविलेल्या विशेष वीजचोरी शोध मोहिमेत एक हजार १८९ वीजचोऱ्या पकडल्या आहेत. या वीज चोरांनी महावितरणची दोन कोटी १३ लाखाची वीज चोरी केली असल्याचे या शोध मोहिमेतून उघडकीला आले आहे. अशी माहिती महावितरणच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, या वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना वीज वापराप्रमाणे देयक शुल्क आणि दंडाची रक्कम भरण्याची नोटीस बजावली आहे. वीज चोरांनी विहित मुदतीत पैसे न भरल्यास त्यांच्यावर वीज अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ऑगस्टमध्ये उल्हासनगर २ विभागात सर्वाधिक ४२० वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली. या चोरांनी ४३ हजार युनिट वीजचोरी केली आहे. वीज मीटरमध्ये फेरफार करणे, विजेच्या खांबावरून चोरून विद्युत पुरवठा घेणे, वीज मीटरला आकडा लावणे असे प्रकार या चोरांनी केले. पालघर जिल्ह्यात ३६९ वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. या भागात वीज चोरांनी १ लाख ६३ हजार वीज युनिट चोरी केल्याचे आढळले. विरार आणि कल्याण ग्रामीण विभागात प्रत्येकी २०४ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.

वीज चोरीमुळे महावितरणच्या महसुली नुकसानीचा भार प्रामाणिकपणे वीज देयक भरणाऱ्या ग्राहकांवर पडत असल्याने यापुढे वीजचोरी सापडल्यास महावितरण चोरांना कायदेशीर मार्गाने शॉक देणार आहे. या चोरीमुळे महसुली नुकसान तर होतेच आहे सोबतच शॉर्ट सर्किट, रोहित्र भार वाढल्याने नादुरुस्त होणे, आगीच्या घटना घडण्याचा धोका आहे.

वीज चोरी करताना आढळून आल्यास संबंधित ग्राहकाचे नाव सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरणचे संचालक संचलन धनंजय औंढेकर यांनी नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला.


मागील महिन्यात कल्याण परिमंडळात ११७५ वीज चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून याचे मुल्यांकन झाल्यानंतर संबंधित ग्राहकांची नावे सार्वजनिक करण्याचा महावितरणचा मानस आहे. या पैकी १६७ वीज ग्राहकांनी तडजोड शुल्कापोटी पाच लाख ७७ हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा केले आहेत. उर्वरित वीज ग्राहकांवर विहीत मुदतीत तडजोड शुल्क न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475