महाराष्ट्र

आठ तलावांची होणार बोटींच्या माध्यमातून सफाई

आठ तलावांची होणार बोटींच्या माध्यमातून सफाई
आठ तलावांची होणार बोटींच्या माध्यमातून सफाई फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ३७ तलाव असून सण-उत्सवामुळे तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माल्याचा कचरा पडतो. सर्व तलावांच्या बाजूने हरित क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पालापाचोळ्याचा कचरा तलावात पडतो. हा कचरा नियमितपणे काढण्यासाठी ठाणे महापालिकेने बोटी खरेदीचा निर्णय घेतला आहे. एकूण ३७ तलावांपैकी सद्यस्थितीत नऊ तलावांवर बोट उपलब्ध आहे. अमृत तलाव योजने अंतर्गत आठ तलावांना बोट प्राप्त होणार आहे. तसेच राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेच्या अंतर्गत पाच तलावांना बोट प्राप्त होणार आहे. एकूण ३७ तलावांपैकी २१ तलावांना बोटी प्राप्त होणार आहेत. तर उर्वरीत १६ तलावांना बोटीची आवश्यकता आहे. तलाव साफसफाईसाठी निगा व देखभालीसह बोट, वल्हे आणि साफसफाई साहित्यासह तलाव बोट, झाडू, पंजा, सेफ्टी जॅकेट खरेदी करण्यासाठी पालिकेकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. बाजारभावानुसार एका बोटीसाठी एक लाख ८०,६०० याप्रमाणे आठ बोटीसाठी १४ लाख ४४,८०० रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. सद्यस्थितीत प्रदूषण नियंत्रण विभागाकडे तलाव पुनरूज्जीवन आणि शुद्धीकरण या लेखाशिर्षकांतर्गत बजेट तरतूद उपलब्ध नसल्यामुळे हे काम तातडीचे असल्यामुळे ७२ (ब) अन्वये निविदा प्रक्रिया राबविण्यास महापालिका आयुक्तांची मान्यता घेण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला आहे. बोट उपलब्ध असलेले तलाव कौसा तलाव, न्यु. शिवाजी नगर तलाव, मखमली तलाव, उपवन तलाव, गांधीनगर तलाव (कमल तलाव), खारीगाव तलाव, रेवाळे तलाव, कचराळी तलाव, कोलशेत तलाव अमृत तलाव योजनेंतर्गत बोटी उपलब्ध होणारे तलाव हरियाली तलाव, ब्रम्हाळा तलाव, रायलादेवी तलाव, दातिवली तलाव, आंबेघोसाळे तलाव, कमल तलाव, जोगिला तलाव, खिडकाळी तलाव राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेंतर्गत बोटी उपलब्ध होणारे तलाव तूर्फेपाडा तलाव, खर्डी तलाव, सिद्धेश्वर तलाव

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475