जिल्हा
अमली पदार्थांच्या म्होरक्याला हैद्राबाद विमानतळावर अटक
अमली पदार्थांच्या म्होरक्याला हैद्राबाद विमानतळावर अटक
फोटो: ठाणे वैभव
दोन कोटींचे एमडी प्रकरण .
कल्याण : मानपाडा पोलीसांनी डाउन टाउन, खोणी पलावा परिसरात २.१२ करोड रूपयांचे १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ मिळुन आलेल्या दाखल गुन्हयातील मुख्य फरार आरोपी बाहेरील देशात पळुन जात असताना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैद्राबाद येथुन अटक करण्यात आली आहे.
मानपाडा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयात दोन पुरूष आरोपी असिल सुर्वे (२६) आणि मोहम्मद इसा मोहम्मद हनीस कुरेशी व एक महिला आरोपी मेहेर फातिमा रिजवान देवजानी या तीन आरोपींना यापुर्वी अटक करण्यात आली होती. या गुन्हयातील मुख्य आरापी मोहम्मद रहिम सलीम शेख उर्फ फरहान हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. २९ जून रोजी या गुन्हयातील मुख्य आरापी मोहम्मद रहिम सलीम शेख उर्फ फरान हा बाहेरील देशात पळुन जात असताना त्याला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैद्राबाद येथे ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोहम्मद शेख हा वेगवेगळ्या देशात जात असल्याची माहीती मिळत असून त्याच्याविरूध्द मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, पोलीस निरीक्षक राम चोपडे, सपोनि कलगोंडा पाटील, संपत फडोळ, महेश राळेभात, सागर चव्हाण, पोशि मिननाथ बडे, किशोर दिघे यांच्या पथकाने केली आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475