जिल्हा

उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार ठाण्यात

उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार ठाण्यात
उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार ठाण्यात फोटो: ठाणे वैभव
ठाणे : दहा दिवसांपुर्वी अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आलेला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयाचे उद्घाटन सोहळा क्रांतीदिनी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे ठाण्यात येणार आहेत. ठाण्यातील पाचपाखाडी भागात राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय असून ही जागा आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मालकीची आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स परिसरात नवे कार्यालय घेतले आहे. २७ जुलै रोजी या कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांंच्या हस्ते करण्यात येणार होते. पंरतु उद्घाटनाच्या दिवशी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा होता. त्यामुळे अजित पवार यांनी कार्यालय उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलण्याच्या सुचना दिल्याने परांजपे यांनी हा कार्यक्रम रद्द केला होता. आता क्रांतीदिनी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव हे उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475