देश-विदेश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक फोटो: ठाणे वैभव
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली. आज संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरी काहीवेळ तपास केला. त्यानंतर साधारण दोन तासांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केली. अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणात नऊवेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, अरविंद केजरीवाल एकदाही ईडीच्या चौकशीला हजर राहिले नव्हते. अखेर गुरुवारी संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांची चौकशी होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतले. ईडीच्या या कारवाईमुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ईडीच्या कारवाईनंतर आपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत अरविंद केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील, असे आपकडून सांगण्यात आले. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. हे एक राजकीय षडयंत्र आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच राहतील. त्यांना तुरुंगात सरकार चालवावे लागले तरी हरकत नाही. मात्र, मुख्यमंत्री केजरीवाल हेच राहतील. ईडीकडून अनेक धाडी टाकण्यात आल्या मात्र, त्यातून एक रुपयाही त्यांना मिळाला नाही. आज लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अटक करण्यात आली. हे एक षडयंत्र आहे. अरविंद केजरीवाल माणूस नाहीत, ते एक विचार आहेत, अशी प्रतिक्रिया आपच्या नेत्या आतिशी मारलेना यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475