जिल्हा

बँकॉक आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत शीतल खरटमलला कास्य

बँकॉक आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत शीतल खरटमलला कास्य
बँकॉक आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत शीतल खरटमलला कास्य फोटो: ठाणे वैभव
ठाणे: जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर ठाणे ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार शीतल खरटमल यांनी बँकॉक (थायलंड) येथे पार पडलेल्या आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत कास्य पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या यशासह त्यांनी जागतिक क्रमवारीत पाचवे स्थान प्राप्त केले असून, त्यांची २०२६ मध्ये किरगीस्थान येथे होणाऱ्या 'वर्ल्ड कॉम्बॅट गेम्स' आणि 'वर्ल्ड नोमाड गेम्स'साठी निवड झाली आहे. शीतल खरटमल या ज्युडो आणि मार्शल आर्टमधील आंतरराष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे ३० वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या नावावर ७२ सुवर्ण, ४७ रजत आणि १७ कास्य पदके आहेत. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२५ मध्ये रशिया (मॉस्को) येथील कॉमनवेल्थ कप आणि २०२३ मध्ये जपान (टोक्यो) येथील एशियन गेम्समध्येही त्यांनी कास्य पदक मिळवून देशाचा तिरंगा फडकवला आहे. ठाणे ग्रामीण पोलीस दलात भरती झालेल्या शीतल सध्या पोलीस जिमच्या इन्चार्ज म्हणून कार्यरत आहेत. त्या केवळ स्वतः सराव करत नाहीत, तर आयपीएस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांनाही प्रशिक्षण व मार्गदर्शन करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475