जिल्हा

बिपरजॉय बिघडले

बिपरजॉय बिघडले
बिपरजॉय बिघडले फोटो: ठाणे वैभव
जुहू चौपाटीजवळ समुद्रात सहाजण बुडाले मुंबई: अरबी समुद्रात घोंघावत असलेले बिपरजॉय चक्रीवादळाने तीव्र रूप घेतलं आहे. समुद्रकिनारी जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. अशात जुहू चौपाटीजवळील समुद्रात सहाजण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुहू चौपाटीजवळ समुद्रात सहाजण बुडाले आहेत. यात दोन जणांना स्थानिकांनी वाचवले आहे. तर, चार जण अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्निशमन पोलीस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन आणि नौदलाकडून चौघांचा शोध सुरू आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475