जिल्हा
भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य
भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य
फोटो: ठाणे वैभव
भिवंडी: भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली असून शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी दिलेल्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
आयुक्त अजय वैद्य हे राज्यकर विभागात सह आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांची भिवंडी महानगरपालिकेत दोन वर्षासाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आल्याचे शनिवार ९ जून २०२३ रोजी दिलेल्या नियुक्तीपत्रात नमूद केले आहे. या दिवसांपासून पालिकेचे आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने ही बदली प्रक्रिया झाल्याची चर्चा दिवसभर सुरु होती.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475