जिल्हा

भोजपुरी अभिनेत्रीला ठाणे गुन्हे शाखेकडून अटक

भोजपुरी अभिनेत्रीला ठाणे गुन्हे शाखेकडून अटक
भोजपुरी अभिनेत्रीला ठाणे गुन्हे शाखेकडून अटक फोटो: ठाणे वैभव

ठाणे : विविध भोजपुरी चित्रपट तसेच वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTU) वेश्याव्यवसाय चालवल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत. 

असहाय्य मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या या अभिनेत्रीच्या तावडीतून पोलिसांनी दोन पीडित तरुणींची सुरक्षित सुटका केली आहे. वागळे इस्टेट येथील पडवळनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली. वागळे इस्टेटमधील एक्सफोटेक पार्कजवळील 'हॉटेल साई टच रेस्टॉरंट अँड बार' येथे काही तरुणींना वेश्याव्यवसायासाठी आणले जाणार असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजली आंधळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास संबंधित हॉटेल परिसरात सापळा रचला.

संशयित अभिनेत्री तेथे पोहोचताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्या सोबत असलेल्या दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली महिला ही अभिनेत्री असल्याने तिने आपल्या या ओळखीचा वापर करून अनेक असहाय्य आणि गरजू मुलींना जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १४३(१), १४३(३) आणि स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम (PITA) १९५६ च्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजली आंधळे व त्यांच्या पथकाने केली असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475