जिल्हा
'ठाणेवैभव'चा दणका; शाळेचे आवार झाले स्वच्छ!
'ठाणेवैभव'चा दणका; शाळेचे आवार झाले स्वच्छ!
फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ : 'ठाणेवैभव'मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अंबरनाथ येथील महात्मा गांधी शाळेचे आवार तत्काळ स्वच्छ करण्यात आले आहे.
अंबरनाथ विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येथील महात्मा गांधी शाळेमध्ये शनिवार 23 रोजी झाली होती. त्यादिवशी शाळेच्या आवारात झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट तीन दिवस झाली तरी लावण्यात आली नव्हती. याबाबत मंगळवार 26 नोव्हेम्बर रोजी 'ठाणेवैभव'मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आज बुधवारी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य खात्याने जमा झालेला कचरा जेसीबी यंत्राद्वारे उचलून नेला. त्यामुळे शाळा परिसरात पसरलेली दुर्गंधी दूर झाली आहे. मैदानाने मोकळा श्वास घेतला आहे, त्यामुळे शाळा आणि विद्यार्थ्यांना देखील दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475