जिल्हा
नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन देण्यास नकार
नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन देण्यास नकार
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी रमेश म्हात्रेसह इतर सर्व आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, जामीन मिळवण्यासाठी रमेश म्हात्रेचे प्रयत्न सुरु आहेत. वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रेला तत्काळ जमीन देण्यास उच्च न्यायालयाने पुन्हा नकार दिला आहे. रमेश म्हात्रेला शुक्रवारपर्यंत जामीन मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त (डीसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आधी डॉक्टरांना मारहाण करायची आणि मग प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागण्याच्या रमेश म्हात्रेच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तुम्ही मतदारांकडे जाता आम्हाला तुमची सेवा करायची आहे, म्हणून मत मागता आणि निवडून आल्यावर मारहाण करता असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेला कानपिचक्या दिल्या आहेत. लोक तुम्हाला मते देऊन निवडून आणतात आणि निवडून आल्यावर फाईल आणि खुर्च्यांनी त्यांची डोकी फोडता, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने असं वागायचं का? असा सवाल देखील मुंबई उच्च न्यायालयाने नगरसेवक रमेश म्हात्रेला केला आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475