जिल्हा

आशेळेकरांचा पाण्यासाठी कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

आशेळेकरांचा पाण्यासाठी कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा
आशेळेकरांचा पाण्यासाठी कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा फोटो: ठाणे वैभव

रिकामे हांडे-बादल्या घेऊन केला आक्रोश

कल्याण : आशेळे परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. आशेळेकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी पक्षाच्या वतीने निर्णायक आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी स्थानिक नगरसेविका कीर्ती ढोणे यांच्या नेत्तृत्वाखाली रिकामे हंडे आणि बादल्या हातात घेऊन कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले.

पाणी समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करत शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. या ठिय्या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते उमेश बोरगावकर, नगरसेविका कीर्ती ढोणे, स्वप्नाली केणे, अपर्णा भोईर, तसेच राहुल कोट, निलेश खंबायत, अॅड. वंदना महाले, शुभम ढोणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संतप्त नागरिकांनी ‘रिकामे नळ आता नाही चालणार’, ‘पाणी नाही... जगणं कठीण’ अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.

आशेळे परिसरातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पाणीप्रश्न तातडीने सोडवला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आशेळेकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे केडीएमसी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पाणी प्रश्नावर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना आणि लेखी आश्वासन मिळत नसल्याचा आरोप करत नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. पाणी समस्या सोडविण्यासंदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आयुक्त दालनाबाहेरून उठणार नाही, असा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला. पाणी हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून, वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम असल्याने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलक नगरसेवकांनी केली आहे. लेखी आश्वासन मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका कीर्ती ढोणे यांनी दिला. यानंतर दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475