देश-विदेश

युद्ध थांबताच सोन्याचे दर गडगडले

युद्ध थांबताच सोन्याचे दर गडगडले
युद्ध थांबताच सोन्याचे दर गडगडले फोटो: ठाणे वैभव
भाव चार हजारांनी घसरला नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानातील युद्ध थांबताच सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. 10 ग्रॅममागे 4000 रुपयांची घसरण दिसून येत असून गेल्या आठवड्यात एक लाख 500 रुपये असणारे सोने आता 96 हजार 710 रुपयांवर आले आहे. इंडियन बुलियन ज्वेलर असोसिएशनच्या आजच्या आकडेवारीनुसार, 11 मे रोजी मुंबईच्या सोने बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 96,710 रुपये तर 22 कॅरेट सोने (प्रति 10 ग्रॅम) – 88,651 रुपयांवर गेले आहे. या घसरणीमुळे सोन्याच्या गुंतवणुकीबाबत साशंक असलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच सोन्याचा भाव एक लाखाच्या वर गेला होता आणि अनेकांनी खरेदी टाळण्याचा निर्णय घेतला होता. आता युद्धजन्य स्थिती निवळताच आणि बाजारात स्थिरता परतताच सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सध्याच्या स्थितीत सोन्याच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्याने सोन्याचे दर अजून कमी होतील, असे काही ग्राहकांना वाटत आहे. तर, काही ग्राहकांना सोन्याचे दर अजून वाढतील अशी अपेक्षा असल्याने खरेदी करावी किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाल्याचे सोने व्यावसायिक सांगत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475