देश-विदेश

पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याला अटक

पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याला अटक
पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याला अटक फोटो: ठाणे वैभव
नवी दिल्ली: जम्मू काश्मीरातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदद करण्याऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद युसुफ कटारिया असे त्याचे नाव असून, तो दक्षिण कश्मीरातील आहे. त्याने 22 एप्रिलला लश्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना मदत केली होती. श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. यानंतर, त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मोहम्मद यूसुफ कटारिया हा लश्कर-ए-तैयबाचा (टीआरएफ) दहशतवादी असून त्याच्यावर बैसरन खोऱ्यात 26 जणांच्या हत्येत सामील असलेल्या दहशतवाद्यांना मदत केल्याचा गंभीर आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "ऑपरेशन महादेव दरम्यान जप्त केलेल्या शस्त्रास्त्रे आणि इतर सामग्रीच्या विश्लेषणानंतर कटारियाला अटक करण्यात आली. दहशतवाद्यांच्या हालचालींना मदत आणि सुविधा पुरवण्यात कटारियाची महत्त्वाची भूमिका होती." महत्वाचे म्हणजे, दक्षिण काश्मीरमधील दहशतवादी नेटवर्कविरुद्धच्या कारवाईतील हे मोठे यश असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कटारियाच्या सहकाऱ्यांची ओळख पटवण्यासंदर्भात आणि लश्कर-ए-तैयबाशी (टीआरएफ) संबंधित दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600