महाराष्ट्र
गाडीच्या बोनेटवर बसून स्टंट करणाऱ्याला अटक
गाडीच्या बोनेटवर बसून स्टंट करणाऱ्याला अटक
फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याणमध्ये भर रस्त्यात बीएमडब्लू कारवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
धक्कादायक म्हणजे ज्या कारवर बसून शुभम मितालिया हा तरुण स्टंट करीत होता, ती कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. ही कार त्या अल्पवयीन मुलाची आहे.
पोलिसांनी या प्रकरणात स्टंटबाज तरुण शुभम मितालिया आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. पुण्यात अल्पवयीन कारचालकाचा प्रताप समोर आला असताना या धक्कादायक घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475