जिल्हा

मोरिवली एमआयडीसीतील वायू प्रदूषण गंभीर-आमदार किणीकर

मोरिवली एमआयडीसीतील वायू प्रदूषण गंभीर-आमदार किणीकर
मोरिवली एमआयडीसीतील वायू प्रदूषण गंभीर-आमदार किणीकर फोटो: ठाणे वैभव

अंबरनाथ : अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीमधून होणाऱ्या वायू प्रदूषणाची समस्या गंभीर असून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेणार नसल्याचा इशारा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिला.

मोरिवली एमआयडीसी परिसरातील काही कंपन्यांकडून वारंवार धोकादायक धूर व वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. किणीकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी संबंधित कंपन्यांच्या कामकाजाची पाहणी करून प्रदूषणासंदर्भातील परिस्थितीची माहिती घेण्यात आली. लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणाला थारा दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे आदेश आमदार डॉ. किणीकर यांनी दिले.

संबंधित कंपनी अधिकाऱ्यांना यावेळी ताकीद देण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन किंवा चुकीचे काम सुरू असल्याचे आढळल्यास कंपनीचे काम तातडीने बंद करण्याची कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. अन्यथा स्थानिक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475