जिल्हा
भिवंडीतील स्मशानभूमीत अघोरी पूजा?
भिवंडीतील स्मशानभूमीत अघोरी पूजा?
फोटो: ठाणे वैभव
दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी : तालुक्यातील पिंपळास गावातील स्मशानभूमीत अघोरी पूजा करणाऱ्या दोघांविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळास गावातील संबंधित दोन आरोपींनी 29 जूनच्या मध्यरात्री ते 4 जुलै दरम्यान गावातील स्मशानभूमीत दोन अनोळखी महिलांचे फोटो लिंबूवर चिटकवून ते लिंबू काळ्या कपड्यामध्ये बांधले होते. ही बाब गावातील काही नागरिकांच्या नजरेस आल्याने गावाचे पोलिस पाटील अशोक जाधव यांनी याबाबत तक्रार दिली आहे. कोनगाव पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन गायकवाड हे करत आहेत.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475