महाराष्ट्र

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचे अपघाती निधन

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचे अपघाती निधन
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचे अपघाती निधन फोटो: ठाणे वैभव
मुंबई: मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रार्थनाच्या वडिलांचं अपघाती निधन झालं आहे. तिने स्वतः वडिलांच्या निधनाबद्दल पोस्ट करून माहिती दिली आहे. तिने वडिलांसाठी एक भावुक पोस्ट केली आहे. तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खुप दुखावलो आहोत, असं प्रार्थना बेहेरेने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रार्थना बेहेरेची जवळची मैत्री प्रिया मराठे हिचं कॅन्सरमुळे निधन झालं. त्यानंतर आता तिने वडिलांना गमावलं आहे. प्रार्थनाच्या वडिलांचं १४ ऑक्टोबर रोजी रस्ते अपघातात निधन झालं. प्रार्थनाने वडिलांचा एक फोटो शेअर करून इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली. “मर के भी किसी को याद आएंगे किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे कहेगा फूल हर कली से बार बार जीना इसी का नाम है “ माझे बाबा …. १४ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन दुर्दैवाने एका रस्ते अपघातात झाले” काही महिन्यांपूर्वीच प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचा ७५ वा वाढदिवस झाला होता. दरम्यान, प्रार्थना बेहेरेची ही पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. केदार शिंदे, मयुरी देशमुख, सुबोध भावे, अमृता खानविलकर, वैभव तत्ववादी, पुष्कर जोग यांनी कमेंट्स करून प्रार्थनाला धीर दिला. तसेच प्रार्थनाच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600