जिल्हा

खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू फोटो: ठाणे वैभव
कल्याण: कल्याण-मलंगगड रोडवरील नेवाळी येथील खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या कल्याण पूर्वेतील चार मित्रांपैकी एका २९ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अतुल आहेर असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील मार्तंड निवास, गणेशवाडी परिसरात राहणारे चार मित्र सोमवारी दुपारच्या सुमारास नेवाळी येथील खदाणीत पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अतुल आहेर यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. अखेर युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून नागरिकांनी धोकादायक खदाणी व तलाव परिसरात पोहण्यासाठी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475