जिल्हा

गोग्रासवाडीतील दलदलीत व्यक्ती अडकला

गोग्रासवाडीतील दलदलीत व्यक्ती अडकला
गोग्रासवाडीतील दलदलीत व्यक्ती अडकला फोटो: ठाणे वैभव

अनधिकृत गोठ्यावर कारवाईची नागरिकांची मागणी

कल्याण : गोग्रासवाडी परिसरातील अनधिकृत गोठ्यामुळे निर्माण झालेल्या शेणाच्या दलदलीत पुन्हा एक व्यक्ती अडकल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या परिसरात अनेक वर्षांपासून गोठा सुरू असून, शेण साचल्याने मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी एका शाळकरी मुलीचा बैलापासून बचाव करताना दलदलीत अडकून जीव धोक्यात आला होता. त्यानंतरही परिस्थितीत कायमस्वरूपी सुधारणा झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गोठ्याच्या परिसरात कृष्ण मंदिर, मारुती मंदिर, जैन मंदिर आणि प्रकाश विद्यालय असल्याने येथे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांची मोठी वर्दळ असते. दुर्गंधी, अस्वच्छता आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

महापालिकेकडून यापूर्वी तात्पुरती कारवाई करण्यात आली होती. मात्र, समस्या पुन्हा निर्माण होत असल्याने अनधिकृत गोठ्यावर ठोस कारवाई करून जनावरांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे, दलदल साफ करावी आणि परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

“गेल्या वर्षी मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. आता पुन्हा व्यक्ती दलदलीत अडकला आहे. आणखी किती घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासन कायमस्वरूपी कारवाई करणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475