जिल्हा

शेतकरी चित्रकाराने भाकरीवर रेखाटली शिवरायांची हुबेहूब प्रतिमा

शेतकरी चित्रकाराने भाकरीवर रेखाटली शिवरायांची हुबेहूब प्रतिमा
शेतकरी चित्रकाराने भाकरीवर रेखाटली शिवरायांची हुबेहूब प्रतिमा फोटो: ठाणे वैभव
ठाणे : मुरबाडच्या एका शेतकरी चित्रकाराने ताटात भाकरी ठेवून त्या भाकरीवर शिवप्रतिमा काढत शिवरायांना अनोख्या पद्धतीने वंदन केले. सचिन पोतदार असे या शेतकरी चित्रकाराचे नाव आहे. तर 'या भूमंडळी ऐसा राजा पुन्हा होणे नाही' असे वाक्य त्यांनी भाकरीवर लिहिले. सचिन पोतदार हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात कुटुंबासह राहात असून ते शेतीचा व्यवसाय करतात. चित्रकलेचा छंद त्यांनी लहानपणापासून जोपासला आहे. पहिल्यांदा शिवजयंतीनिमित्त ही अनोखी कलाकृती सादर केल्याचे सचिन पोतदार यांनी सांगितले. छत्रपती शिवरायांमुळेच आम्हाला शेतीतून भाकरी मिळाली, अशी त्यामागे भावना असल्याचे सचिन पोतदार यांनी सांगितले. सचिन यांनी काढलेले चित्र आज ठाणे जिल्ह्यात आकर्षणाचा विषय ठरला आहे. अत्यंत सुंदर असे शिवरायांचे चित्र सर्वांनाच भावत आहे. अनेकजण सचिन यांचे कौतुक करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475