जिल्हा

रुग्णालयातील रिसेप्शनिस्टला तरुणाकडून बेदम मारहाण

रुग्णालयातील रिसेप्शनिस्टला तरुणाकडून बेदम मारहाण
रुग्णालयातील रिसेप्शनिस्टला तरुणाकडून बेदम मारहाण फोटो: ठाणे वैभव
* व्हिडिओ व्हायरल होताच मनसे नेत्यांची कल्याणात धाव * पीडित मुलीला भेटले, आरोपीचा शोध सुरू कल्याण : कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाकडून बेदम मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. माहिती मिळताच मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पीडित मुलीची भेट घेतली. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक करावी, अन्यथा मनसे कार्यकर्ते समर्थ असल्याचा इशारा त्यांनी दिला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल झा असे आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नांदिवलीतील एका खासगी रुग्णालयात पीडित तरुणी ही रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. गोपाल झा हा परप्रांतीय तरुण डॉक्टरांना भेटायला आला होता. यावेळी डॉक्टरांच्या केबिनमध्ये आधीच एमआर बसले होते. त्यामुळे डॉक्टरकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा असे तरुणी आरोपीला बोलली. यानंतर गोपालने तिच्याशी वाद घालायला सुरवात केली. यानंतर तरुणीच्या अंगावर धावून येत तिला लाथ मारली. यामुळे तरुणी खाली पडली. आरोपीने तिच्या केसांना धरून तिला फरफटत नेत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली. घडलेली घटना निंदनीय आहे. आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्याआधी जनतेने प्रसाद द्यायला पाहिजे, अशी तिखट प्रतिक्रिया भाजपाचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी दिली. दरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी देखील पदाधिकाऱ्यांसह कल्याणात धाव घेतली. त्या मुलीची भेट घेऊन तिला धीर दिला. मनसे तिच्या पाठीशी खंबीर उभी आहे. तिला वैद्यकीय मदत देणार आहोत. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक करावी, अन्यथा त्याला शोधून चोप द्यायला मनसे कार्यकर्त्यांना वेळ लागणार नाही, असा इशारा श्री.जाधव यांनी दिला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475