जिल्हा

ठामपातील डाॅक्टरची इमारतीवरून उडी मारत आत्महत्या

ठामपातील डाॅक्टरची इमारतीवरून उडी मारत आत्महत्या
ठामपातील डाॅक्टरची इमारतीवरून उडी मारत आत्महत्या फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे महापालिकेतील डाॅक्टर शर्मिन नाखवा (३३) यांनी घरातील खिडकीमधून सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. मुंब्रा येथील कौसा भागात ठाणे महापालिकेचे स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालय आहे. या रुग्णालयात डाॅ. शर्मिन नाखवा या कार्यरत होत्या. मुंब्रा येथील एम.एम. व्हॅली परिसरातील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील सदनिकेत त्यांचे वडिल शब्बीर डिंगा हे वास्तव्यास आहेत. बुधवारी सकाळी ११.१५च्या सुमारास डाॅ. शर्मिन या वडिलांच्या घरी होत्या. सदनिकेतील खिडकीतून त्यांनी इमारतीखाली उडी घेतली. घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. डाॅ. शर्मिन यांच्या आत्महत्येची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. डाॅ. शर्मिन यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475