जिल्हा

मिनी बस उलटून १७ प्रवासी जखमी

मिनी बस उलटून १७ प्रवासी जखमी
मिनी बस उलटून १७ प्रवासी जखमी फोटो: ठाणे वैभव
गंभीर जखमींमध्ये आठ प्रवासी मुरबाडचे अलिबाग: मुरबाडहून जेजुरीला निघालेल्या मिनी बसचा मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. बस उलटल्याने सतरा प्रवासी जखमी झाले यातील आठ जणांची प्रकृती चिंताजनक असून ते मुरबाड येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर पनवेल आणि कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एचओसी ब्रिजजवळ एका तीव्र उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे मिनी बस उलटली. बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. बसमधून 17 प्रवासी प्रवास करत होते. ज्यात लहान मुलांचाही समावेश होता. देवदर्शनासाठी हे सर्वजण मुरबाडवरून जेजुरीला निघाले होते. या दुर्घटनेत 17 प्रवासी जखमी झाले. यातील आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमींमध्ये कमलाबाई रामचंद्र माळी, गुरुनाथ डोंगरे, बाळाराम भोईर, रवींद्र राम माळी, गुलाबबाई दत्तू हुमणे, अशोक जयराम डोंगरे, कस्तुरी गणेश माळी आणि मीनाबाई गुरुनाथ डोंगरे यांचा समावेश आहे. सर्व जखमी हे मुरबाड तालुक्यातील शेळकेपाडा परिसरातील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट विभाग, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल ॲम्बुलन्स, स्वामिनी ॲम्बुलन्स तसेच हेल्प फाउंडेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली. सर्व यंत्रणांनी तातडीने मदतकार्य राबवत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी हलविले. बस अपघातातील जखमींवर प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खोपोली नगरपालिका रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना एमजीएम हॉस्पिटल, पनवेल येथे दाखल करण्यात आले आहे. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशन हद्दीत घडला असून पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600