जिल्हा

लोकमान्यनगर उद्ध्वस्त करून रिंग मेट्रो नको

लोकमान्यनगर उद्ध्वस्त करून रिंग मेट्रो नको
लोकमान्यनगर उद्ध्वस्त करून रिंग मेट्रो नको फोटो: ठाणे वैभव

हजारो नागरिक आक्रमक

ठाणे: ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रिंग मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली लोकमान्यनगरातील हजारो कुटुंबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही, असा आक्रमक इशारा लोकमान्यनगर बचाव सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे. काल हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला.

Article Image

यावेळी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री प्रताप सरनाईक यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, विकासाला विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली नागरिकांचे विस्थापन आणि विनाश मान्य नाही, रिंग मेट्रो प्रकल्पामुळे कमीत कमी नागरिक बाधित होतील आणि जास्तीत जास्त ठाणेकरांना त्याचा लाभ मिळेल, अशा पर्यायी मार्गांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. काही मोजक्या हितसंबंधांसाठी हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची घाई करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे कमीत कमी नागरिक बाधित होतील आणि बाधित होणाऱ्या नागरिकांचे १०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय प्रकल्प लादला जाणार नाही, अशी ग्वाही देखील मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिली.

यावेळी बैठकीला जितेंद्रकुमार इंदिसे, जयेंद्र दरेकर, रामचंद्र गुरव, राजीव शिरोडकर, भालचंद्र देसाई, प्रदीप चव्हाण, सागर भोसले, बालेश हत्तीआंबीरे, मल्हारी सावरे,नगरसेविका शीतल ढमाले, नगरसेवक, राकेश शिंदे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी आपल्या अडचणी, भीती आणि भविष्यातील संभाव्य संकटांबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. मेट्रो प्रकल्प ठाणेकरांसाठी महत्त्वाचा असला, तरी त्यासाठी लोकमान्यनगराला किंमत मोजावी लागणार असेल, तर प्रकल्पाच्या नियोजनावरच पुनर्विचार करण्याची गरज आहे, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.

लोकमान्यनगरातील हजारो घरे बाधित झाल्यास त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्यातच काही बिल्डरांच्या कथित हितासाठी लोकमान्यनगर उद्ध्वस्त करून क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा डाव आहे का?, असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475