जिल्हा
काशीमिरातील ६४२ विद्यार्थी शिक्षकांविना?
काशीमिरातील ६४२ विद्यार्थी शिक्षकांविना?
फोटो: ठाणे वैभव
भाईंदर : माशाचा पाडा, काशिमीरा येथील मीरा-भाईंदर महापालिका शाळा क्रमांक १९मध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असून सर्व शिक्षक एसआयआरच्या कामासाठी नियुक्त झाल्याने या विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प झाले आहे.
या शाळेत ६४२ विद्यार्थी शिक्षण घेत असून केवळ १० शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, एसआयआर प्रक्रियेसाठी या शाळेतील सर्व १० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन ठप्प झाल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी केला आहे. शाळेला भेट दिल्यानंतर संदीप राणे यांनी मुख्याध्यापकांकडे याबाबत जाब विचारला. त्यावेळी मुख्याध्यापकांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगत, यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्याबाबत सुचविले.
मनसेने या निर्णयाचा निषेध करत, महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन शिक्षकांना तातडीने पुन्हा अध्यापनासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे संदीप राणे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणावर महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475