जिल्हा
४७ वी ठाणेवैभव करंडक स्पर्धा
४७ वी ठाणेवैभव करंडक स्पर्धा
फोटो: ठाणे वैभव
अझिम काझीचे शतक;
सत्यजित बॅनर्जीचे पाच बळी
ठाणे: येथील दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात झालेल्या 'अ' गटातील पहिल्या लढतीत रिलायन्सविरुद्ध मफतलालच्या अझीम काझीने ७३ चेंडूत चार चौकार आणि आठ षटकारांसह झंजावाती शतक (११०) झळकविले तर सेंट्रल मैदानावर झालेल्या 'ब' गटातील लढतीत टाइम्स ऑफ इंडियाच्या सत्यजित बॅनर्जीने गोदरेज स्टाफचा निम्मा संघ १३ धावांत गुंडाळून आपापल्या संघास विजयी केले. यंदाचा पहिला शतकवीर ठरण्याचा मान अझीम काझीने संपादित केला.
दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात आज तीन वर्षांनी 'ठाणेवैभव' करंडक स्पर्धेचे सामने होत आहेत. या प्रसंगी ठाण्याचे ज्येष्ठ अष्टपैलू खेळाडू मुकुंद सातघरे व हरेश्वर मोरेकर यांनी सामन्याचे उदघाटन केले. स्पर्धा समन्वयक प्रल्हाद नाखवा यांनी सूत्रसंचालन केले.
संक्षिप्त धावफलक
'अ' गट : प्रथम फेरी :
मफतलाल क्रिकेट क्लब ३५ षटकात २४४ (सिद्धांत आधाटराव ३३, अझीम काझी ११०, मोहन पेडणेकर ७-१-६१-३, ओंकार जाधव ६-१-२४-३) विजयी विरुद्ध रिलायन्स ग्रुप सर्विसेस ३५ षटकात ७ बाद २२२ (शुभम पूर्णार्थी ३८ चेंडूत ४ चौकार, २ षटकारांसह ४८, हेमंत मलबारी ४२, आदित्य कोळी ३१, मोहन पेडणेकर ३५, पुनीत त्रिपाठी ७-०-३१-३)
'ब' गट : प्रथम फेरी
गोदरेज स्टाफ २६. ४ षटकात १२५ (सागर दहावडे ४२ (२७ चेंडू, ४ चौकार १ षटकार), प्रवीण घाडगे ३५, सत्यजित बॅनर्जी ७-०-१३-५, पंकज सावंत ५-१-२९-२) पराभूत विरुद्ध टाइम्स ऑफ इंडिया २५.२ षटकात ५ बाद १२६ (शेखर कदम २७, ऋषिकेश पडवळ ४१ चेंडूत ९ चौकार, २ षटकारांसह नाबाद ६१, जी. पुवय्या ७-०-२३-३)
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475