जिल्हा
उल्हासनगरच्या निवडणुकीत २८ अर्ज बाद; ६७४ उमेदवार रिंगणात
उल्हासनगरच्या निवडणुकीत २८ अर्ज बाद; ६७४ उमेदवार रिंगणात
फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणुकीत एकूण ७८ जागांसाठी तब्बल ७०२ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यानंतर झालेल्या छाननी प्रक्रियेनंतर २८ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे उल्हासनगर महापालिका निवडणुकींच्या रिंगणात सध्या ६७४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
२ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर अंतिम उमेदवार निश्चित होतील. त्यानंतर कोणत्या प्रभागात बंडखोरी राहिली आणि कुठे बंडखोर थंड झाले ते स्पष्ट होणार आहे.
शहरात यंदा शिंदेंची शिवसेना भाजपच्या विरोधात रिंगणात असून शिवसेनेच्या सोबत साई पक्ष आणि कलानी गट निवडणूक लढत आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटासोबत मनसे आणि कॉंग्रेस निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रिपाईं, बहुजन समाज पार्टी, अजित पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष रिंगणात आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ७०२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475