जिल्हा

रिक्षाचालकाकडून २२ तोळे सोने प्रवाशाला परत

रिक्षाचालकाकडून २२ तोळे सोने प्रवाशाला परत
रिक्षाचालकाकडून २२ तोळे सोने प्रवाशाला परत फोटो: ठाणे वैभव

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत एका रिक्षाचालकाने रिक्षात विसरलेले एका प्रवासी महिलेचे २२ तोळे सोने व एक लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी विष्णुनगर पोलिसांच्या उपस्थितीत परत केली. हरिश्चंद्र यादव असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे.

दोन दिवसांपूर्वी डोंबिवली पश्चिमेतील माणकोली उड्डाणपुलाजवळील स्वामी नारायण सिटी येथून एक महिला यादव यांच्या रिक्षात बसली. या महिलेजवळ पिशवी होती. त्यांना डोंबिवली स्थानकाजवळ जायचे होते. रिक्षाचालक यादव यांनी या महिलेला डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील रसरंजन हाॅटेल समोरील रस्त्यावर व रेल्वेच्या प्रवेशद्वारावर आणून सोडले. त्या महिलेकडून भाडे घेतल्यानंतर यादव पुन्हा प्रवासी भाड्यासाठी निघून गेले. तर महिला रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघून गेली. काही वेळाने यादव यांना रिक्षेच्या पाठीमागील आसनावर पिशवी असल्याची दिसली. ही पिशवी त्या महिलेला परत करण्यासाठी यादव यांनी प्रयत्न सुरू केले. अखेर त्यांनी ही पिशवी विष्णुनगर पोलीस ठाण्यात जमा केली.

दुसरीकडे संबंधित महिला पिशवी राहिलेल्या रिक्षाचा शोध घेत होत्या. रिक्षा आढळून न आल्याने त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाणे गाठले. यावेळी रिक्षाचालक आणि महिलेची भेट झाली. ओळख पटल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे आणि महिला पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत २२ तोळे सोने आणि एक लाख २० हजाराची रक्कम असलेली पिशवी प्रवासी महिलेच्या स्वाधीन करण्यात आली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475