महाराष्ट्र

थायलंडच्या १५ महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका

थायलंडच्या १५ महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका
थायलंडच्या १५ महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगरमधील घटना ठाणे : थायलंड देशातील महिलांना आर्थिक अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या पाच जणांना ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी थायलंडच्या १५ महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. उल्हासनगर येथील सेक्शन १७ मधील सितारा लॉजिंग अँड बोर्डींगमध्ये विदेशी महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री ग्राहकाला पाठवून छापा घातला. या प्रकरणात पोलिसांनी लाॅजचा व्यवस्थापक पंकज सिंग (३७) याच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले. तसेच थायलंडच्या १५ महिलांची सुटका केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी पाच लाख २७ हजार रुपयांची रोकड आणि साहित्य जप्त केले. सिंग आणि तेथील कर्मचाऱ्यांविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे अशी माहिती शेखर बागडे यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475