जिल्हा
ट्रक-कंटेनरचा अपघातात १२ वऱ्हाड्यांचा मृत्यू
ट्रक-कंटेनरचा अपघातात १२ वऱ्हाड्यांचा मृत्यू
फोटो: ठाणे वैभव
पालघरमधील घटना, २५ जण जखमी
पालघर: पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाल्याचे कळते. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पालघरच्या धानीवरी येथे वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर यांचा भीषण अपघात झाला. वऱ्हाडाच्या ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी असल्याची माहिती मिळत आहे. यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. वीस ते पंचवीस जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
300x450
300x600