जिल्हा

कसारा-आसनगाव दरम्यान १२ दिवसांचा मेगाब्लॉक

कसारा-आसनगाव दरम्यान १२ दिवसांचा मेगाब्लॉक
कसारा-आसनगाव दरम्यान १२ दिवसांचा मेगाब्लॉक फोटो: ठाणे वैभव

कसारा: ७ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प आणि कसारा येथे 'अप' यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या अनुषंगाने १२ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

'प्री-नॉन-इंटरलॉकिंग', 'नॉन-इंटरलॉकिंग' आणि 'पोस्ट-नॉन-इंटरलॉकिंग' कामांसाठी सदर मेगा ब्लॉक होणार आहे. आसनगाव आणि कसारा दरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेचे काम हे कसारा आणि कल्याण दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाचाच एक भाग आहे. यामुळे मेल/एक्सप्रेस आणि उपनगरीय रेल्वे सेवांची वाहतूक स्वतंत्र करणे शक्य होईल आणि मार्गिकेची क्षमता भविष्यात वाढवण्यासाठी आवश्यक अशी अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण होईल. तसेच, यामुळे कामकाजात अधिक लवचिकता येईल, गाड्यांच्या हालचालींचे नियमन अधिक सुरळीत होईल आणि अतिरिक्त गाड्यांची सेवा हाताळण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल.

या मोठ्या प्रकल्पाचे पूर्ण लाभ मिळवण्याच्या दृष्टीने हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. या कामाचे पूर्ण कार्यान्वयीन लाभ संपूर्ण प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित झाल्यानंतरच मिळतील असे रेल्वे सूत्रांकडून अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.

ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाही. ब्लॉकपूर्वी 'डाऊन नॉर्थ ईस्ट' मार्गावर कसारा येथे जाणारी शेवटची उपनगरी ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.३० वाजता सुटेल. ब्लॉकपूर्वी 'अप नॉर्थ ईस्ट' मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी शेवटची लोकल कसारा येथून 2.42 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर 'डाऊन नॉर्थ ईस्ट' मार्गावर कसारा येथे जाणारी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 6.28 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर 'अप नॉर्थ ईस्ट' मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी पहिली लोकल कसारा येथून 8.35 वाजता सुटेल.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475